08 March 2021

News Flash

मुलीचा बुरखा घातलेला फोटो पोस्ट केल्याने ए. आर. रहमान ट्रोल

फोटो शेअर केल्यामुळे रहमान झाला ट्रोल

ऑस्कर विजेता संगीतकार ए. आर. रहमानवर सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतो आहे. बुधवारी रहमानने निता अंबानींसोबत त्याच्या पत्नी आणि मुलींचा फोटो शेअर केला. या फोटोत त्याच्या मुलीने बुरखा परिधान केला होता. या फोटोमुळे ए. आर. रहमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली. रहमानने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर फोटो शेअर केला होता. निता अंबानी यांच्यासोबत माझ्या कुटुंबातील महिला खतिजा, रहीमा आणि सायरा #freedomtochoose असा हॅशटॅगही त्याने पोस्ट केला आहे. या फोटोत खतिजाने बुरखा घातला आहे. त्यामुळे अनेक नेटकऱ्यांनी रहमानला ट्रोल केलं आहे.

बुरख्यात कसलं आलं आहे स्वातंत्र्य? असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे. खतिजाने बुरखा घातला आहे मात्र रहीमाने नाही, असं का? चेहराच दाखवायचा नव्हता तर फोटो कशाला काढला असाही प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. स्लमडॉग मिलेनियर या सिनेमाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला बॉलिवुडच्या अनेक दिग्गजांची हजेरी होती. यावेळी रहमानची मुलगी खतिजा आपल्या वडिलांबाबत बोलताना भावुक झाली होती.

याच कार्यक्रमात निता अंबानीही उपस्थित होत्या. त्यावेळी रहमानच्या कुटुंबातील महिलांनी फोटो काढला. त्यावर नेटकऱ्यांनी रहमानला ट्रोल केलं. एखाद्या सेलिब्रेटीला ट्रोल करण्याची पहिली वेळ नाही. याआधीच फराह खानलाही ट्रोल करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2019 5:49 pm

Web Title: netizens troll a r rahman for his family photo
Next Stories
1 सी फूड खाणं सोनूला पडलं महागात
2 Video : लवकरच प्रदर्शित होणार ‘डोक्याला शॉट’
3 अखेर प्रियांकानेच उलगडलं त्या फोटोग्राफर्सचं गुपित
Just Now!
X