News Flash

मोनो-मेट्रो स्थानकांपासून नवे बसमार्ग सुरू करणार

मोनो आणि मेट्रो रेल्वेचे आव्हान पेलण्यासाठी बेस्टने योजना आखायला सुरुवात केली आहे. मोनो-मेट्रो स्थानकांवरून आसपासच्या परिसरासाठी बससेवा सुरू करण्याचा बेस्टचा मानस असून त्यासाठी एमएमआरडीएबरोबर चर्चा

| August 6, 2013 06:21 am

मोनो आणि मेट्रो रेल्वेचे आव्हान पेलण्यासाठी बेस्टने योजना आखायला सुरुवात केली आहे. मोनो-मेट्रो स्थानकांवरून आसपासच्या परिसरासाठी बससेवा सुरू करण्याचा बेस्टचा मानस असून त्यासाठी एमएमआरडीएबरोबर चर्चा सुरू आहेत.
मोनो आणि मेट्रो रेल्वे सुरू झाल्यानंतर बेस्टला त्याचा मोठा फटका बसेल अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आधीच तोटय़ात असलेल्या बेस्टपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र मोनो आणि मेट्रोच्या स्थानकांपासून प्रवाशांना त्यांच्या घराजवळ पोहोचविण्याची योजना बेस्टने आखली आहे. त्यासाठी वातानुकूलित बससेवा सुरू करण्यात येणार आहे. अंतर कमी झाल्यामुळे आपोआपच प्रवाशांना कमी पैशांमध्ये वातानुकूलित बसमधून घरी जाता येईल. तसेच काही ठिकाणांहून रिंगबस सेवाही सुरू करण्याचा बेस्टचा विचार आह़े  तसेच चेंबूर वा देवनारमध्ये हब उभारून नवे बसमार्ग सुरू करण्याचाही मानस आहे, असे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 6:21 am

Web Title: new bus route will start from mono metro stations
टॅग : Best Bus
Next Stories
1 शिक्षण मंडळे करतात काय ?
2 गुन्हेगारांच्या शिक्षेचा टक्का वाढला
3 ‘शिवडी- न्हावाशेवा सेतू’ची निविदा प्रक्रिया पुन्हा अपयशी
Just Now!
X