17 July 2019

News Flash

पोलीस गणवेशात टोपीऐवजी ‘कॅप’

नवी कॅप ही काळ्या रंगाची असून दर्शनी भागावर पिवळ्या रंगात पोलीस  बोधचिन्ह असेल.

मुंबई : पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशातील टोपी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पारंपरिक टोपीऐवजी बेस बॉल खेळातील ‘कॅप’चा समावेश दैनंदिन कामकाजावेळी करावा, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गुरुवारी दिले. माजी महासंचालक दत्ता पडसलगीकर मुंबई आयुक्तपदी असताना प्रायोगिक तत्त्वावर या कॅपचा गणवेशात समावेश करण्यात आला होता.  धावपळीत टोपी डोक्यावरून सरकते, उन-पावसापासून संरक्षण होत नाही, अशा तक्रारी असंख्य पोलिसांनी वरिष्ठांकडे केल्यानंतर या बदलाचा विचार करण्यात आला. नवी कॅप ही काळ्या रंगाची असून दर्शनी भागावर पिवळ्या रंगात पोलीस  बोधचिन्ह असेल.

First Published on April 26, 2019 1:01 am

Web Title: new cap for mumbai police 2