News Flash

खडसे, पंकजा, तावडे, बावनकुळे यांची निराशाच

विधान परिषदेसाठी भाजपतर्फे नवे चेहरे

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेले किं वा पराभूत झालेले एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या माजी मंत्र्यांची विधान परिषदेची आमदारकी मिळवण्याची योजना यशस्वी होऊ शकली नाही. पक्षाने या ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारून त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय समितीने नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची घोषणा केली. या चौघांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्जही दाखल केले.

विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे आदी विधानसभेच्या वेळी उमेदवारी नाकारलेले किंवा पराभूत झालेले इच्छूक होते. भाजपमधील पक्षांतर्गत शीतयुद्धात खडसे, मुंडे, तावडे यांना संधी मिळू नये, असाच प्रयत्न सुरू होता. एका नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास अन्य नेत्यांवर अन्याय केल्यासारखे झाले असते. यातूनच माजी मंत्र्यांचा नावांचा विचार झाला नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

खडसे, मुंडे, तावडे यांना विधान परिषदेवर संधी दिली असती तर विरोधी पक्षनेतेपदासाठी या नेत्यांच्या नावाचा विचार करावा लागला असता किं वा त्यांनी या पदावर दावा के ला असता. पक्षासाठी ते योग्य ठरले नसते. विधानसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार निश्चित करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा बाजी मारली. खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न किंवा त्यांची वक्तव्ये त्यांना भोवली आहेत.

अन्य पक्षातील दोघांना संधी

पक्षाने उमेदवारी देताना रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या अन्य पक्षांमधून आलेल्यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता करण्यात आली. गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे नेते असून, राष्ट्रीय समाज पक्ष, भाजप, वंचित आघाडी आणि पुन्हा भाजप असा प्रवास के ला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगली मतदारसंघातून वंचितच्या वतीने निवडणूक लढविली होती तर विधानसभेला अजित पवार यांच्या विरोधात बारामती मतदारसंघातून अयशस्वी लढत दिली होती. धनगर समाजातील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या पडळकर यांना उमेदवारी देऊन पक्षाने त्याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला.

दटके हे नागपूरचे माजी महापौर असून उच्चशिक्षित आहेत. नांदेडचे डॉ. अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते असून, पक्षाच्या वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आहेत. सध्या करोनाचा मुकाबला करण्यासाठी पक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या वैद्यकीय मदतीतही त्यांनी बरेच काम केले आहे.

पक्षाने दोन इतर मागासवर्गीय तर प्रत्येकी एक भटका व विमुक्त तर मराठा अशांना उमेदवारी देऊन जातीचे समीकरण साधण्याचा प्रयत्न केला. तसेच विभागवारही प्रतिनिधित्व देण्यात आले.

उदयनराजे, पडळकर यांच्यासाठी अपवाद

लोकसभा किंवा विधानसभेत पराभूत झालेल्यांना राज्यसभा अथवा विधान परिषदेवर भाजपकडून एरवी संधी दिली जात नाही. पण राजकीय ताकदीच्या उद्देशानेच लोकसभेच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेल्या उदयनराजे भोसले यांना राज्यसभा तर पडळकर यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन अपवाद करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 12:06 am

Web Title: new faces from bjp for the legislative council abn 97
Next Stories
1 अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी
2 आयुक्तांच्या बदलीवरून भाजपाचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
3 मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली, इकबाल चहल नवे आयुक्त
Just Now!
X