छत्रपती शिवाजी टर्मिनस(सीएसटी) येथे सोमवारी मुंबईतील सर्वाधिक लांबीच्या पादचारी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. सीएसटी स्थानकावरील या पादचारी पुलाची लांबी २७० मीटर तर रूंदी ५.३मीटर इतकी आहे. स्थानकारील सर्व १८ फलाटांशी हा पादचारी पुल जोडण्यात आला आहे. त्यामुळे जे.जे. फ्लायओव्हरमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोहोंची बचत होणार आहे.