23 September 2020

News Flash

राज्यात नवा उच्चांक; दिवसभरात ११,५१४ रुग्ण

गेल्या २४ तासात मुंबई ९१०, पुणे १५१२, पिंपरी-चिंचवड ९८५, नाशिक ६०२ नवे रुग्ण आढळले आहेत.

संग्रहित छायाचित्र

राज्यात गुरुवारी ११,५१४ रुग्णांची नोंद झाली. एका दिवसातील रुग्णसंख्येचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. पुणे आणि नाशिक शहरातील रुग्णसंख्या वाढली आहे.

गेल्या २४ तासांत ३१६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. याच कालावधीत १०,८५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या ४ लाख ७९ हजार झाली असून, आतापर्यंत १६,७९२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात मुंबई ९१०, पुणे १५१२, पिंपरी-चिंचवड ९८५, नाशिक ६०२ नवे रुग्ण आढळले आहेत.

देशातील रुग्णसंख्या २० लाखांजवळ

देशात गेल्या २४ तासांत ५६ हजार २८२ नव्या रुग्णांची नोंद झाली तर, ९०४ मृत्यू झाले. त्यामुळे देशातील रुग्णसंख्या १९ लाख ६४ हजार ५३६ वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा ४० हजार ६९९ वर गेला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ४६ हजार १२१ रुग्ण करोनामुक्त झाले असून, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ लाख २८ हजार ३३६ आहे. उपचाराधीन रुग्ण ५ लाख ९५ हजार ५०१ आहेत. करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६७.६२ टक्के, तर मृत्युदर २.०७ टक्क्यांवर आला आहे.

राज्यांना ८९० कोटी

कोविड १९ आपत्कालीन निधीअंतर्गत केंद्राने २२ राज्यांना ८९०.३२ कोटी रुपये देण्यात आले. पहिल्या हप्त्यात एप्रिलमध्ये राज्यांना ३ हजार कोटी दिले होते. २४ मार्च रोजी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी करोनाविरोधातील लढय़ासाठी १५ हजार कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली होती. त्याअंतर्गत राज्यांना हा निधी पुरवला जात आहे.

मृत्यूदर २.०७ टक्क्यांवर

देशात रुग्णवाढ सुरूच असली तरी मृत्यूचे प्रमाण उत्तरोत्तर घटत आहे. देशातील मृत्यूदर २.०७ टक्क्यांवर घसरला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यूप्रमाण कमी आहे. केंद्राने वेळीच उपाययोजना आणि अन्य पावले उचलल्याने मृत्यूदरावर नियंत्रण आणण्यात यश येत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 12:22 am

Web Title: new highs in the state 11514 patients per day abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 यूपीएससी गुणवंताशी संवादाची संधी
2 मजुरांच्या मुलांचे आता गावातच शिक्षण
3 यांत्रिक मच्छीमारांचा शार्कला धोका
Just Now!
X