News Flash

योग व निसर्गोपचाराच्या विकासासाठी विधेयक

विधेयकानुसार महाराष्ट्र योग व निसर्गोपचार परिषदेची स्थापना करण्यात येणार आहे.

योग व निसर्गोपचाराच्या विकासासाठी अधिक संधी निर्माण करण्यासह त्यांचे अध्यापक व व्यवसाय यांचे सुसूत्रीकरण करणे आवश्यक असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत ‘महाराष्ट्र योग व निसर्गोपचार विधेयक २०१६’च्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. हे विधेयक आगामी अधिवेशनात मांडले जाईल.
विधेयकानुसार महाराष्ट्र योग व निसर्गोपचार परिषदेची स्थापना करण्यात येणार आहे. तिची घटना व रचना ही सध्या अस्तित्वात असलेल्या अन्य राज्यांच्या परिषदांप्रमाणेच असणार आहे. या क्षेत्रात नवीन शिक्षण संस्था व अभ्यासक्रम सुरु करणे, संशोधन संस्थांना मान्यता देण्यासंदर्भात शासनाला मार्गदर्शन करणे, योग व निसर्गोपचारामधील मान्यताप्राप्त शिक्षण संस्था व संलग्न रुग्णालयांसह विविध केंद्रांची तपासणी करणे व त्यांना अधिस्वीकृती देणे, या क्षेत्रातील व्यवसायिक व कर्मचाऱ्यांच्या नोंदी ठेवणे, त्यांच्यासाठी आचारसंहिता तयार करणे आदी कामे परिषद करणार आहे. नोंदणीकृत कर्मचारी व व्यावसायिकांविरुद्ध गैरवर्तणुकीबाबत परिषद चौकशी करून कारवाई करू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2016 12:02 am

Web Title: new legislation for yoga and naturopathy development
टॅग : Yoga
Next Stories
1 महाराष्ट्रातील पाणीटंचाई आणि दुष्काळाची समस्या ही मानवनिर्मित- मुख्यमंत्री
2 मध्य रेल्वे विस्कळीत
3 मोदी आणि भाजप सरकार फक्त दिखाऊपणात मग्न, राज ठाकरेंची सडकून टीका
Just Now!
X