नवी मुंबई विमानतळाला विरोध करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. पर्यावरणाचा कोणताही अभ्यास न करता विमानतळ बांधणीचा घाट घातला जात आहे. विमानतळ बांधण्यात आल्यास पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन मुंबई, ठाणे आणि नवी ममुंभईला धोका पोहोचू शकतो, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
सोसायटी फॉर सेव्ह मॅनग्रोव्ह्ज अ‍ॅण्ड एक्झीस्टंन्स ऑफ नवी मुंबई या संस्थेने ही याचिका केली आहे. नवी मुंबई विमानतळाचा हा प्रकल्प रद्द करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर १९ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.