News Flash

नवी मुंबई महापालिका निवडणूक सहा महिने पुढे ढकला : आव्हाड

'करोना'च्या पार्श्वभूमीवर असा निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाला पाठवले पत्र

जगभरात धुमाकुळ घालत असलेल्या व भारतातही शिरकाव केलेल्या करोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात ३२ वर पोहचली आहे. मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई महापालिकेची निडणूक सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी मुख्य निडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

करोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळात नवी मुंबई येथे होणाऱ्या महापालिका निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात यावा,अशी मागणी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे करण्यात आली असल्याचं आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. ट्विटबरोबर त्यांनी पत्र देखील जोडलं आहे.

“करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेचे हित लक्षात घेऊन काही शहरांमध्ये सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणं तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. नजिकच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीदरम्यान मोठ्याप्रमाणात नागरिक एकमेकांच्या संपर्कात येतील, त्यामुळे या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी, असे सुचवण्यात येत आहे.” असं आव्हाड यांनी शनिवार १४ मार्च रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

या अगोदर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडले यांनी देखील करनोच्या पार्श्वभूमीवर आगामी औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केलेली आहे. औरंगाबाद महापालिका निडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी, निवडणूक पुढे ढकलताना पालिकेवर प्रशासक नेमू नये, विद्यमान नगरसेवकांना सहा महिने मुदतवाढ द्यावी अशी मागणी महापौर घोडले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 3:05 pm

Web Title: new mumbai municipal elections postponed for six months awhad msr 87
Next Stories
1 करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचे आदेश
2 मुंबई ते मांडवा आता पाऊण तासात, रो-रो सेवेचा शुभारंभ
3 वाक्चातुर्याने वक्तृत्व झाकोळले!
Just Now!
X