नवी मुंबई: अप्पर पोलीस आयुक्त निशिकांत मोरे यांनी विनयभंग केलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. ही मुलगी डेहराडून येथे आढळून आली आहे. या प्रकरणी मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने ही मुलगी निराश झाली होती.

या  वाढदिवसाच्या कार्यक्रमात मोरे यांनी विनयभंग केला, असा आरोप  युवतीने केला. हा घडलेला प्रकार पीडित मुलीच्या पालकांनी नवी मुंबई पोलिसांच्या कानावर घातला, मात्र मोरे अति उच्चपदस्थ पोलीस अधिकारी असल्यामुळे पोलिसांनी दखल घेतली नाही.

नंतर दबाव वाढल्यानंतर तळोजा पोलिसांनी या प्रकरणी २६ डिसेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल केला. तिने ६ जानेवारी रोजी आपण आत्महत्या करण्यासाठी जात आहोत, माझ्या आत्महत्येला निशिकांत मोरे हेच जबाबदार आहेत, असे पत्र घरात लिहून ठेवून ती गायब झाली होती. आठ दिवसांनंतर ही मुलगी डेहराडून येथे सापडली असून तिला नवी मुंबईत आणण्यात आले आहे.