निवडणुका होणाऱ्या राज्यातील नेत्यांशी चर्चा

काँग्रेस पक्षात दिल्लीच्या पातळीवर निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यावर राहुल गांधी यांनी भर दिला असून, निवडणुका असलेल्या राज्यातील नेत्यांना एकत्र बसवून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयोग सुरू केला आहे. बिहारमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानेच अन्यत्र त्याची पुनरावृत्ती केली जात आहे.

एप्रिल व मे महिन्यात निवडणुका असलेल्या पाच राज्यांमधील नेत्यांशी संवाद साधण्याची प्रक्रिया राहुल गांधी यांनी सध्या सुरू केली आहे. बुधवारी त्यांनी तामिळनाडूमधील नेत्यांशी चर्चा केली. अलीकडेच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी गांधी यांनी हा प्रयोग केला होता. राज्यातील सर्व नेत्यांना एकत्र बसवून त्यांच्यासमोर तीन प्रस्ताव ठेवले होते. नितीशकुमार-लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर आघाडी, फक्त नितीशकुमार की स्वतंत्र लढायचे हे पर्याय ठेवले होते. सर्वानी नितीशकुमार-लालू यांच्याबरोबर आघाडी करण्यास अनुकूलता दर्शविली. बिहारमध्ये नेतेमंडळींशी चर्चा करून निर्णय घेतल्याने पक्षात एकवाक्यता राहिली, असे राहुल यांनी गेल्याच आठवडय़ात मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितले होते.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात पक्षात सारी निर्णय प्रक्रिया ही नवी दिल्लीतूनच होत असे.