04 August 2020

News Flash

करोनाबाधित मृतांच्या नोंदीसाठी १ जुलैपासून नवी कार्यपद्धती

‘गुगल फॉर्म’च्या माध्यमातून करोनाबाधित रुग्णांची नोंद

प्रतिकात्मक छायाचित्र

करोनाबाधित मृतांच्या आकडेवारीवरून निर्माण झालेला गोंधळ भविष्यात टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने नव्या पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जुलैपासून शासकीय, पालिका आणि खासगी रुग्णालयांना ‘गुगल फॉर्म’च्या माध्यमातून करोनाबाधित रुग्णांची नोंद करावी लागणार आहे.

४८ तासांमध्ये ही माहिती पालिकेच्या साथ प्रतिबंधक विभागाला सादर करावी लागणार आहे. याबाबतचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी जारी केले आहेत.

साथ प्रतिबंधक विभागाला मृतांच्या नोंदीची माहिती ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाला पदसिद्ध अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. या अधिकाऱ्यांचे नाव, हुद्दा, मोबाइल क्रमांक, ई-मेल आदी माहिती पालिकेला कळवावी लागणार आहे. मृतांची माहिती पाठविण्यात विलंब झाल्यास वा माहितीमध्ये काही तफावत असल्यास संबंधित रुग्णालयातील पदसिद्ध अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

या नव्या कार्यपद्धतीमुळे भविष्यात मृत्यूच्या नोंदीमधील घोळ दूर होतील, असा विश्वास पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, रुग्णालयांकडून करोनाबाधितांच्या मृत्यूची माहिती पालिकेला वेळेवर मिळत नाही, मृत्यूची सारांश माहिती पाठविण्यात विलंब होतो, एकाच व्यक्तीच्या मृत्यूची माहिती अनेक वेळा पाठविण्यात येते अशा विविध कारणांमुळे घोळ निर्माण झाल्याची कबुली या परिपत्रकात देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 12:26 am

Web Title: new procedure for registration of corona deaths from 1st july abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुंबईचा मृत्यूदर, संसर्ग प्रसार चिंताजनक
2 वांद्रे, माटुंगा, दहिसरमध्ये ‘सेरो’ सर्वेक्षण
3 एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
Just Now!
X