05 April 2020

News Flash

करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतरच रेडीरेकनरचे नवे दर

कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती

प्रतिनिधिक छायाचित्र

करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतरच राज्यात जमिनीच्या वार्षिक बाजार मुल्य तक्तयाचे नवे दर (रेडीरेकनर) जाहीर के ले जातील. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून रेडीरेकनरच्या दरात तुर्तास कोणतीही वाढ होणार नसल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरूवारी दिली.

बांधकाम उद्योगातील मंदीमुळे तसेच गत वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे राज्यात गेल्या दोन वर्षांपासून रेडी रेडीरेकनरच्या दरात कोणताही  वाढ झालेली नाही. त्यातच राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे यावेळी रेडीरेकनरच्या दरात काही प्रमाणात वाढ करण्याचा प्रस्ताव मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षकानी तयार के ला होता. नियमानुसार १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे नवे दर राज्यात लागू होणार होते. मात्र करोनाच्या प्रादुर्भावामुळे रेडीरेकनरचे दर लागू करण्याचे सरकारचे नियोजन कोलमडून पडले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी करोनाच्या  संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे  यावर्षीचे रेडीरेकनर दर ३१ मार्चला जाहीर होणार नसून करोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील असे थोरात यांनी सांगितले.

सरकारकडून प्रयत्न

जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. धान्य ऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल याबाबतीतही नियोजन सुरू आहे. शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये निर्बंध नाही. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून जे हार्वेस्टिंग मशीन येथे आलेले आहेत, त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल, तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनरीला इंधन दिले जाईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. संचारबंदीला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नये, अशा सूचना राज्य शासनमार्फत जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून वाहतूक सुरळीत केली जात असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 1:11 am

Web Title: new rate of redirecionar only after the corona crisis escaped abn 97
Next Stories
1 घराबाहेर पडण्याच्या वादातून तरुणाची हत्या
2 पुढील शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक कोलमडणार
3 आठ खासगी प्रयोगशाळांत करोना तपासणी
Just Now!
X