06 March 2021

News Flash

आजपासून वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला

निर्धारित वेळापत्रकानुसार काम 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होते . मात्र काम मुदतीआधीच म्हणजे 21 डिसेंबरला पूर्ण झाले.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथे वसई खाडीवर असलेला नवा पूल रविवारी सकाळी सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला. पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी 8 डिसेंबरपासून हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला होता, तसेच पुलाची केवळ एकच बाजू हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्यात आली होती . त्यामुळे या मार्गावर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत होती.

पुलाच्या दुरुस्तीच्या निर्धारित वेळापत्रकानुसार काम 25 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होते . मात्र काम मुदतीआधीच म्हणजे 21 डिसेंबरला पूर्ण झाले. त्यांनतर आवश्यक असलेल्या 24 तासांच्या क्यूरिंग नंतर 23 डिसेंबरला सकाळी 9 वाजल्यापासून पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात आला अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 3:42 pm

Web Title: new versova bridge open for all kind of vehicles including heavy vehicles also
Next Stories
1 मुंबईचे माजी नगरपाल नाना चुडासामा यांचे निधन
2 गोरेगावमध्ये निर्माणाधीन दुमजली इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू; 7 जखमी
3 मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
Just Now!
X