09 August 2020

News Flash

इमारतीवरून फेकल्याने कांदिवलीत नवजात बालिकेचा मृत्यू

कांदिवली पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

मुंबई : नवजात बालिकेला इमारतीवरून फेकल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवलीत गुरुवारी दुपारी घडली. या मुलीची नाळही शाबूत असून, एका महिलेने तिला फेकल्याचे पोलीस तपासात आढळले आहे.

कांदिवली पश्चिम येथील जय भारत गृहनिर्माण सोसायटीत गुरुवारी दुपारी नवजात अर्भक सापडल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळविली. त्यानंतर कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी तातडीने ते अर्भक कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेले. परंतु त्याआधीच ते मृत झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

अभिलाख नगरमधील जय भारत सोसायटीच्या बी विंगमध्ये सापडलेले अर्भक मुलगी असून तिला इमारतीवरून खाली फेकल्याचे तपासात समोर आले आहे. तिला फेकणाऱ्या महिलेची ओळख पटलेली आहे.

या महिलेला वैद्यकीय उपचारांची गरज आहे. प्रकृती सुधारल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तूर्तास या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 1:07 am

Web Title: newborn girl dies after being thrown off building in kandivli zws 70
Next Stories
1 बँक आणि खातेदारांच्या हितासाठी निर्बंध घालण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेला सर्वस्वी अधिकार – उच्च न्यायालय
2 नीरव मोदी फरारी आर्थिक गुन्हेगार!
3 कांजूर कचराभूमीची स्थगिती रद्द
Just Now!
X