शारदा रात्र नाइट स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज या संस्थेत शिक णाऱ्या विद्यार्थ्यांच्या निकालात लक्षणीय वाढ झाली आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचा यंदाचा १२वीचा निकाल हा ९१ टक्के लागला असून वाणिज्य शाखेत अजित पवार हा विद्यार्थी ७७.०८ टक्के मिळवून पहिला आला आहे. कला शाखेत विशाला घावरी याने ६९.५४ टक्के गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक मिळविला, तर किसन आचरेकर याने ६९.५४ टक्के मिळवून विज्ञान शाखेत पहिला आला आहे. दहावीचा निकाल ८८.४६ टक्के इतका लागला आहे. विनोद म्हसदे याने ७७ टक्केगुणांची कमाई केली आहे. या विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कामगिरी उंचावण्यात शिक्षकांबरोबरच ‘मासूम’ या स्वयंसेवी संस्थेचे मार्गदर्शन लाभले.

‘कोशिश’चा निकाल १००%
‘कोशिश’ या कर्णबधिर मुलांच्या शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेच्या ममता यादव या विद्यार्थिनीला ८०.८० टक्के गुण मिळाले आहेत. शाळेच्या एकूण १४ पैकी ५ विद्यार्थिनींना विशेष प्रावीण्य मिळाले आहे आणि उर्वरित विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली आहे. ही शाळा विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण पुरविते. इच्छुक पालकांकरिता संपर्क- कोशिश कार्यालय, दफ्तरी रोड, मालाड (पूर्व). दूरध्वनी- २८४४६४४८, २८८३४६२९.

आनंद सभा राजापूर तालुक्यातील
‘बा. ल. साठे कनिष्ठ महाविद्यालया’चा निकाल या वर्षी ९८.२५ टक्के इतका लागला असून त्या निमित्ताने ‘देवाचे गोठणे शिक्षण प्रसारक मंडळ’तर्फे आनंद महोत्सवी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जूनला सायंकाळी ४ वाजता
दादरच्या छबिलादास हायस्कूल येथे ही सभा होईल. संस्थेचे अध्यक्ष सभेच्या अध्यक्षस्थानी असतील. या सभेला सर्व ग्रामस्थ,
माजी विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शैक्षणिक सदरासाठी
या सदराकरिता आपला मजकूर पुढील पत्त्यावर पाठवावा.
लोकसत्ता कार्यालय, पहिला मजला, एक्स्प्रेस टॉवर्स, नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१.
दूरध्वनी- २२०२२६२७, ६७४४००००.
फॅक्स- २२८२२१८७. ई-मेल- mumbailoksatta@gmail.com