18 September 2020

News Flash

पुढचा मुख्यमंत्री १०० टक्के शिवसेनेचाच – ‘सामना’तून वचन

राज्याचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार असल्याचा विश्वास पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे.

| June 19, 2014 11:17 am

राज्याचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार असल्याचा विश्वास पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात व्यक्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेकडे विधानसभेसाठी समसमान जागा लढविण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व स्थितीत ४८ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेच्या पदाधिकाऱयांचा दोन दिवसांचा मेळावा मुंबईत सुरू आहे. या मेळाव्यात सर्वच पदाधिकाऱय़ांनी आणि नेत्यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीचे उमेदवार असतील, अशी भावना व्यक्त केली असतानाच पक्षाच्या मुखपत्राततही पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार असल्याचे म्हटले आहे.
मंत्री, खासदार, आमदार नव्हे तर शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद आहे व या ताकदीवर पक्ष महाराष्ट्राचे महाभारत जिंकणार असल्याचे म्हटले आहे. आम्ही महाराष्ट्राला शंभर टक्के शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार आहोत, हे आमचे वचन आहे. मोदी यांच्या रूपाने दिल्लीच्या तख्तावर एक मजबूत पंतप्रधान लाभला. आता महाराष्ट्राच्या मजबुतीचा विडा उचलून शिवसेनेने विजयाचा बेलभंडारा उचलला आहे, असे अग्रलेखात लिहिण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 11:17 am

Web Title: next chief minister will be from shiv sena party
टॅग Shiv Sena
Next Stories
1 महायुतीतील पक्षांशी चर्चा करूनच मुख्यमंत्रीपदाचा निर्णय – उद्धव ठाकरे
2 बहुजन समाज पक्षाचा राष्ट्रवादीशी आघाडीस नकार
3 पंकजा मुंडे यांचा भाजपच्या राज्यातील कोअर समितीत समावेश
Just Now!
X