“मागच्या वर्षी लोकसत्ताच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला आलो होतो, त्यावेळी मी पुढच्या वर्षी लोकसत्ताच्या कार्यक्रमाला येईन की, नाही असं अनेकांना वाटलं होतं. पण मी आलो. लोकसत्ताच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री म्हणूनच मी पुढची पाच वर्ष येईन,” असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा- माझं आव्हान आहे, सरकार या क्षणी पाडून दाखवा – उद्धव ठाकरे

लोकसत्ताच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. नरिमन पॉईंट येथील एक्स्प्रेस टॉवरमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २०२० मधील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा दस्तावेज असलेल्या ‘लोकसत्ता वर्षवेध’चे प्रकाशन करण्यात आलं.

आणखी वाचा- कोणी मला खलनायक ठरवलं तरी चालेल, पण…- उद्धव ठाकरे

या सोहळ्यात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. “मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणं, ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी काळजी घेतोय. कुणालाही त्याच्या स्वातंत्र्यापासून रोखणं ही आनंद देणारी गोष्ट नाही, अशी खंत त्यांनी करोना काळातील अनुभवाबद्दल बोलताना व्यक्त केली. “आपल्या देशात लसीकरण सुरु झालं आहे. पण लसीची उपयुक्तता किती आहे, ते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल,” असा आशावादही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.