19 September 2020

News Flash

विदर्भ- मराठवाडय़ात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

पावसाच्या तुरळक शिडकाव्याने पाऊस परतल्याचा आनंद होत असला तरी राज्यातील पावसाच्या स्थितीचे गांभीर्य वाढल्याने अद्ययावत नोंदींवरून दिसत आहे.

| August 27, 2015 12:03 pm

पावसाच्या तुरळक शिडकाव्याने पाऊस परतल्याचा आनंद होत असला तरी राज्यातील पावसाच्या स्थितीचे गांभीर्य वाढल्याने अद्ययावत नोंदींवरून दिसत आहे. १ जून ते २६ ऑगस्टदरम्यान राज्यातील जिल्हानिहाय पावसाच्या प्रमाणावरून विदर्भातील नागपूरसह अमरावती व वर्धा हे अपवाद वगळता इतरत्र पावसाची तूट आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील तीन दिवस विदर्भासह मराठवाडय़ातही मुसळधार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे.
उर्वरित राज्याच्या तुलनेत कोकणात पावसाच्या तुरळक का होईना पण सरी येत असल्या तरी सरासरीच्या तुलनेत सुमारे तीस टक्के तूट आहे. मुंबईत ७१ टक्के, मुंबई उपनगरात ९० टक्के, ठाण्यात ७१ टक्के, रायगडमध्ये ६६ टक्के, रत्नागिरीत ७४ टक्के तर सिंधुदुर्ग येथे ७६ टक्के पाऊस पडला आहे. मराठवाडा सर्वाधिक तहानलेला असून उस्मानाबाद येथे ४३ टक्के, बीडमध्ये ३८ टक्के, लातूरमध्ये ३९ टक्के तर परभणीत अवघा ३५ टक्के पाऊस पडला.
केंद्रीय वेधशाळेच्या अंदाजानुसार कोकणात तुरळक सरी येतील. त्याच वेळी बंगालच्या उपसागरात ओडिसा व आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ व मराठवाडय़ात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 12:03 pm

Web Title: next three days heavy rains expected in vidarbha and marathwada
Next Stories
1 ‘खड्डय़ांच्या तक्रारींसाठीच्या यंत्रणेला प्रसिद्धी द्या’
2 मुंबईत स्वाइनचे आणखी २५ रुग्ण
3 राज्यातही आरक्षणाचा मुद्दा पेटविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
Just Now!
X