19 September 2020

News Flash

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपनिश्चिती नाही!

उच्च न्यायालयानेही या खटल्याची जलदगतीने सुनावणी घेण्याचे आदेश विशेष न्यायालयाला दिले होते.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई  : मालेगावमधील २००८ सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घ्यावी असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही या प्रकरणातील आरोपींनी असहकार पुकारल्याने शुक्रवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाला त्यांच्यावर आरोपनिश्चित करता आले नाहीत. खटल्याच्या कामकाजाला विलंब करण्यासाठी आरोपी हेतुत: आरोपनिश्चितीच्या प्रक्रियेसाठी हजर राहिले नाहीत, असे निरीक्षण नोंदवत ३० ऑक्टोबरच्या सुनावणीलाही आरोपींनी गैरहजर राहून असहकार पुकारल्यास आवश्यक ते आदेश देण्यात येतील, असा निर्वाणीचा इशारा न्यायालयाने दिला.

उच्च न्यायालयानेही या खटल्याची जलदगतीने सुनावणी घेण्याचे आदेश विशेष न्यायालयाला दिले होते. त्यानुसार आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदाअंतर्गत शुक्रवारी आरोप निश्चित करण्यात येणार होते. परंतु कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी या दोघांचा अपवाद वगळता एकही आरोपी न्यायालयापुढे हजर झाला नाही. या प्रकाराबाबत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्याचवेळी आरोपनिश्चितीची प्रक्रिया ३० ऑक्टोबरला केली जाईल. आरोपींना आणखी एक संधी दिली जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र त्या वेळी आरोपी गैरहजर राहिले तर आवश्यक ते आदेश देण्यात येतील, असा निर्वाणीचा इशाराही न्यायालयाने दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 1:58 am

Web Title: nia court defers framing of charges in malegaon blasts case
Next Stories
1 अलोक नाथ यांना दिलासा नाहीच!
2 खय्याम यांना हृदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान
3 ‘स्थानिक निवडणुकांचाही ‘एक राष्ट्र – एक निवडणुकी’त विचार व्हावा’
Just Now!
X