वांद्रय़ाच्या चेतना महाविद्यालयातील चाकुहल्ला प्रकरणातील पीडित मुलीची प्रकृती अद्याप गंभीर असून रविवारच्या तुलनेत तिची प्रकृती खालावल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र निखिलने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी मुलीच्या मैत्रिणींचे आणि निखिलच्या पालकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
चेतना महाविद्यालयात शिकणाऱ्या पायल बलसारा हिच्यावर निखिलने शनिवारी केलेल्या चाकुहल्ल्यात पायल गंभीररित्या जखमी झाली आहे. तिच्यावर गुरुनानक रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सोमवारी आणखी खालावल्याचे सूत्रांनी सांगितले. पायल शुद्धीवर आल्याशिवाय तिचा जबाब नोंदवता येणार नाही.
तपासाला अधिक वेग देण्यासाठी सोमवारी पायलच्या मैत्रिणींचे जबाब नोंदवले. या सर्वातून निखिलने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचा शोध पोलीस घेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 4:31 am