मुंबईतील भायखळा भागात नायजेरियन ड्रग्ज माफियांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारची गंभीर घटना घडली आहे. पोलिसांनी या गोळीबारावर नियंत्रण मिळवत सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या सगळ्यांची कसून चौकशी सुरु आहे. मुंबईतील भायखळा भागात हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईतील भायखळा भागात नायजेरिनय ड्रग्ज माफिया आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला. छापा मारल्यानंतर नायजेरिन नागरिकांना पकडण्यासाठी पोलीस पुढे सरसावले असता काहींनी पोलिसांवर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी पुन्हा फायरिंग करत या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आता ताब्यात घेण्यात आलेल्या सात जणांची चौकशी सुरु आहे. या सगळ्यांकडे बंदुका आल्या कशा याचीही माहिती पोलीस मिळवत आहेत असेही समजले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2018 5:19 pm