News Flash

करोनावर आयुर्वेदिक औषध देतो सांगून फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक

हरियाणातील मंत्र्याच्या पुतण्याची देखील फसवणूक

पैशांच्या बदल्यात करोनावर आयुर्वेदिक औषध देण्याचे सांगून लोकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या नायजेरियन व्यक्तीकडून चालवण्यात येत असलेल्या एका टोळीला चेंबूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. करोना उपचार करण्यासाठी आयुर्वेदीक औषध असल्याचे सांगून आरोपींनी अनेकांची फसवणूक केली. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये या टोळीने अनेकांना गंडा घातला आहे. त्यानंतर आता पोलिसांना यातील ४ जणांना अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

मोहम्मद शेख, शिवाजी बिनगुडे आणि श्रीजुगीलाल कर्मी आणि सलीम शेख अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर पोलीस या टोळीतील अन्य साथीदारांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून बनावट कागदपत्रे, सीम कार्ड आणि खोट्या कागदपत्रे देऊन उघडलेली ६४ बॅंक खात्याची माहिती जप्त केली आहे. या खात्यांवरुन आरोपींनी तब्बल साडेपाच कोटी रुपयांचा व्यवहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

करोनावरील आयुर्वेदीक औषध असल्याचे सांगून आरोपी लोकांना आरोपी लोकांना आमिष दाखवात असत. ते फक्त ऑनलाईनच मागणी नोंदवत असत. त्यांनी कधीही कोणालाही औषधे दिली नाहीत पण मुंबई, हैद्राबाद, ओडिशा, केरळ आणि कर्नाटक येथे अनेकांची फसवणूक केली. लोकांना फक्त त्यांनी आश्वासनं दिली आणि पैसे घेतले असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांनी सांगितले.

आरोपींनी चेंबूर येथे बनावट ओळखपत्रांद्वारे एक ऑफिस भाड्याने घेतले होते. तसेच लोकांना फसवण्यासाठी बनावट बँक खाती देखील उघडली होती. यामध्ये आरोपींना हरियाणा येथील एका मंत्र्याच्या पुतण्याची देखील फसवणूक केली होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला असून अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2021 3:43 pm

Web Title: nigerians arrested for cheating on ayurvedic medicine abn 97
Next Stories
1 तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ३० टक्के खाटा वाढवणार!
2 बंदुक भी तेरी, गोली भी तेरी, तारीख भी तेरी… भाजपाचं शिवसेनेला चॅलेंज
3 मुंबईत पुन्हा कडक निर्बंध लागणार?
Just Now!
X