05 March 2021

News Flash

वसई ते भाइंदर दरम्यान शुक्रवार-शनिवारी रेल्वेचा विशेष ब्लॉक

नायगाव येथील भुयारी मार्गाच्या कामानिमित्त वसई रोड आणि भाइंदरदरम्यान शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक करण्यात येणार आहे.शुक्रवारी १० मे रोजी रात्री ११.५५ ते पहाटे

| May 10, 2013 04:42 am

नायगाव येथील भुयारी मार्गाच्या कामानिमित्त वसई रोड आणि भाइंदरदरम्यान शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री विशेष ब्लॉक करण्यात येणार आहे.शुक्रवारी १० मे रोजी रात्री ११.५५ ते पहाटे ५.२५ पर्यंत भाइंदर ते वसई रोडदरम्यान जलद मार्गावर, तर शनिवारी ११ मे रोजी जलद मार्गावर दोन्ही दिशेने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री १०.२० (वसई रोड-बोरिवली), ११.५३ (बोरिवली-नालासोपारा), पहाटे ५.०६ (बोरिवली-विरार) आणि ५.२२ (विरार-अंधेरी) या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. तर शनिवारी रात्री १०.२० (वसई रोड-बोरिवली), ११.५३ (बोरिवली-नालासोपारा) या दोन गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकच्या काळात काही मेल-एक्स्प्रेस तसचे उपनगरी गाडय़ा १० ते १५ मिनिटे विलंबाने धावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 4:42 am

Web Title: night block on western railway between vasai and bhayandar
Next Stories
1 सहानुभूती मिळवण्यासाठी व्यापाऱ्यांची चालबाजी
2 प्रीती राठी अ‍ॅसिड हल्लाप्रकरणी तरुणाला अटक
3 मॉडेलचे अपहरण करणाऱ्यास दिल्लीत अटक
Just Now!
X