News Flash

नीलेश राणेंना २३ मेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश

न्यायालयाने त्यांना २३ मे पर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

काँग्रेसचे कायकर्ते संदीप सावंत यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. न्यायालयाने त्यांना २३ मे पर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणात अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.


चिपळूण न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने नीलेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्यासमोर त्यांच्या गेल्या आठवड्यात सुनावणी झाली. त्या वेळेस कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध झाली असून, त्यात तपास पूर्ण झाल्याचे आणि कोठडीची गरज नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही बाब नीलेश यांच्या बाजूने जाणारी असल्यामुळे अटकपूर्व जामिनात त्यानुसार दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे त्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी नीलेश यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी न्यायालयाला केली होती. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी आज, १७ मे रोजी ठेवली होती. न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळतानाच २३ मेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

HC tells Nilesh Rane to surrender before police on or before May 23.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2016 4:06 pm

Web Title: nilesh rane withdraws anticipatory bail plea
टॅग : Nilesh Rane
Next Stories
1 High Temperature: राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता, काय काळजी घ्यावी…
2 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : प्रज्ञासिंगला दोषमुक्त करण्याच्या निर्णयास निधर्मी संघटनेचा विरोध
3 वीटभट्टी कामगारांची मुले शिक्षणाचे धडे गिरवताहेत!
Just Now!
X