27 September 2020

News Flash

नववर्ष सोहळ्यावर नजर ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची नऊ पथके!

नववर्ष स्वागत समारंभासाठी एक दिवसाचे परवाने उत्पादन शुल्क विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत

(संग्रहित छायाचित्र)

 

नववर्षांचे स्वागत करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या समारंभात मद्याचे वितरण करताना परवाने घेणे आवश्यक आहेत.  परवान्याशिवाय असे समारंभ आढळले तर त्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नऊ पथके नेमली आहेत. याशिवाय अशा समारंभातून भेसळयुक्त मद्याचे वितरण होऊ नये, याची तपासणी करण्याची जबाबदारीही या पथकावर सोपविण्यात आली आहे.

नववर्ष स्वागत समारंभासाठी एक दिवसाचे परवाने उत्पादन शुल्क विभागाने ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत. तसेच प्रत्येक कार्यालयातही असे परवाने देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेल्स, तसेच देशी-विदेशी मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांनाही अशा पद्धतीने परवाने वितरीत करण्यात आले आहेत. त्यांचीही अचानक तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोवा तसेच दीव-दमण येथून येणाऱ्या रेल्वे तसेच बसचीही तपासणी केली जाणार आहे.

या वर्षांत उत्पादन शुल्क विभागाने २९९ गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये ३०६ आरोपींना अटक केली. हातभट्टी, बनावट देशी-विदेशी मद्य, उच्च प्रतीचे मद्य, दमण, गोवा येथील मद्य असा ५२ लाखांचा साठा हस्तगत केला आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ६७ जणांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रस्ताव राज्याच्या पोलीस दलाला पाठविण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक सी. बी. राजपूत व दोन उपअधीक्षक यांची दोन तर कार्यकारी निरीक्षकांची नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. नववर्षांच्या समारंभातून मोठय़ा प्रमाणात भेसळयुक्त मद्याचा वापर होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी, असे आवाहन उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 1:41 am

Web Title: nine excise duty teams to monitor new years celebrations abn 97
Next Stories
1 महालक्ष्मी येथे लवकरच पालिकेचे पशुवैद्यकीय रुग्णालय
2 नाताळ आणि नववर्षांनिमित्त पहाटे पाचपर्यंत मद्यविक्री
3 महाराष्ट्रातील जपानी भाषिक ‘गाईड’ अभ्यासदौऱ्यासाठी आज जपानला
Just Now!
X