22 April 2019

News Flash

Loksatta Tarun Tejankit: गेल्या वर्षी निपुण धर्माधिकारीनं मारली बाजी! यंदा तुमचा नंबर?

तुम्हीही यंदाच्या 'लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी नावनोंदणी करु शकता

निपुण धर्माधिकारी

‘भाडिपा’मुळे पडद्यामागून पडद्यावर दिसून लागलेला चेहरा म्हणजे निपुण धर्माधिकारी. कला क्षेत्रातील योगदानासाठी मागील वर्षी निपुणने पटकावला ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कार. लेखन, दिग्दर्शन, अभिनय आदी सर्वच क्षेत्रांत नावाला जागणाऱ्या या कलावंताने गेल्या दोनेक वर्षांमध्ये यूटय़ूबद्वारे अफाट प्रसिद्धी मिळविली आहे. यूटय़ूबवरील त्याच्या विविध बेधडक उपक्रमांना तरुणाईने अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. तुम्हीही कला क्षेत्रामध्ये ठसा उमटवलाय ? तुमची ओळखही उत्तम कलाकार अशी आहे का? उत्तर हो असल्यास तुम्हीही यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्कारासाठी अर्ज करु शकता. जाणून घ्या अटी, नियम आणि इतर येथे क्लिक करुन

नक्की वाचा >> पहिल्या पर्वातील विविध क्षेत्रांमधील १२ लखलखते हिरे

वाचा >> ‘तरुण तेजांकित’ला भरभरून प्रतिसादाची झळाळी

साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य, प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत तरुण पाय रोवून काम करत आहेत. विचारांना कृतीची जोड देत परिस्थिती बदलू पाहात आहेत. नवे मानदंड निर्माण करत आहेत. त्यांच्या परिश्रमाचे, प्रज्ञेचे कौतुक ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ या उपक्रमातून करण्यात येते. गेल्या वर्षी या उपक्रमांतर्गत १२ तरुण प्रज्ञावंतांचा गौरव करण्यात आला.

यंदाच्या ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वालाही भरभरून प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील प्रज्ञावंतांच्या आग्रहास्तव नावनोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नावनोंदणीसाठी.. : लखलखत्या हिऱ्यांचे यंदाचे शोधपर्व सुरू झाले आहे. त्यासाठी तरुणांनी  http://taruntejankit.loksatta.com/methodology/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जात माहिती भरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरांनाही आपल्या भवताली दिसणाऱ्या गुणवंत तरुणांची नावे माहितीसह सुचवता येईल.

First Published on February 9, 2019 8:01 am

Web Title: nipun dharmadhikari won loksatta tarun tejankit award now its your turn