29 March 2020

News Flash

नीरव मोदीच्या कलासंपत्तीचा लिलाव

आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) मोदीच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत.

अमृता शेरगील, हुसेन, गायतोंडे यांच्या कोटय़वधी रुपयांच्या चित्रांचे आकर्षण

मुंबई : पंजाब-नॅशनल बँक गैरव्यवहारातील आरोपी नीरव मोदीच्या जप्त केलेल्या ११२ वस्तूंचा लिलाव २७ फेब्रुवारी, ३ आणि ४ मार्चला होणार आहे. अमृता शेरगील, एम. एफ. हुसेन, व्ही. एस. गायतोंडे आणि अन्य प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती या लिलावातील प्रमुख आकर्षण असेल. आंतरराष्ट्रीय बॅ्रण्डच्या हॅण्डबॅग, मनगटी घडय़ाळांसह (लिमिटेड एडिशन) आणि रोल्स रॉईस मोटारीचाही लिलाव करण्यात येणार आहे.

आर्थिक गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) मोदीच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. ‘ईडी’च्या वतीने सॅफ्रनआर्ट संस्थेने लिलावाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ‘सॅफ्रनआर्ट’ने दिलेल्या माहितीनुसार २७ फेब्रुवारीला ४० वस्तूंचा प्रत्यक्ष लिलाव होईल, तर उर्वरित ७२ वस्तूंचा लिलाव ३ आणि ४ मार्चला ऑनलाइन पद्धतीने केला जाईल.

लिलावातील चित्रसंपदा

अमृता शेरगील यांचे ‘बॉइज विथ लेमन’ हे चित्र १२ ते १८ कोटी रुपयांना विकले जाईल, असा अंदाज सॅफ्रनआर्ट संस्थेने व्यक्त केला आहे. एम. एफ. हुसेन यांचे ‘बॅटल ऑफ गंगा अ‍ॅण्ड जमुना, महाभारत १२’ या चित्राचाही तितक्याच किमतीला लिलाव होईल. त्याखालोखाल व्ही. एस. गायतोंडे, मनजीत बावा, राजा रवी वर्मा यांचीही चित्रे लिलावात असतील.

* प्रत्यक्ष लिलावात प्रसिद्ध चित्रकारांच्या १५ कलाकृतींचा समावेश.

*अमृता शेरगिल यांच्या १९३५मधील ‘बॉईज विथ लेमन’ चित्राचा प्रथमच लिलाव.

* हॅण्डबॅग, मनगटी घडय़ाळे आणि ‘रोल्स रॉईस घोस्ट’ कारसह आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या ७२ वस्तूंचाही समावेश.

* लिलाव सॅफ्रन आर्ट संस्थेच्या प्रभादेवी येथील कार्यालयात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 4:05 am

Web Title: nirav modi s art collection luxury watches to be auctioned zws 70
Next Stories
1 डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण  : ‘नायर’मधून शिक्षण पूर्ण करण्याची आरोपींची विनंती फेटाळली
2 काँग्रेस, राष्ट्रवादीचा ‘एनपीआर’ला विरोध कायम
3 मनमानी करणाऱ्या साखर कारखान्यांवर बँकेची खप्पामर्जी
Just Now!
X