लवकरच काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात जाणार आहे असा ट्विट काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचंही स्वागत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा नारायण राणे यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षात नितेश राणे जाणार हे निश्चित होतेच. मात्र त्यांनी उदयनराजे भोसले यांनाही या पक्षात येण्याचं निमंत्रण दिलंय. उदयनराजे भोसले हे बलाढ्य नेते आहेत, आमचे चांगले मित्र आहेत.त्यांचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात स्वागत असा ट्विट नितेश राणेंनी केला आहे. त्यांच्या या सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उदयनराजे एक ताकदवर नेते आहेत..आमचे चांगले मित्र आहेत..
मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षत जात आहे ..
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांच ही स्वागत आहे!— nitesh rane (@NiteshNRane) October 8, 2018
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 8, 2018 1:00 pm