News Flash

गडकरींकडून मोदी यांना हिऱ्यांचा हार!

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यावर माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी प्रदान केलेला हिऱ्यांच्या हाराची किंमत किती होती,

| September 20, 2013 12:17 pm

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यावर माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी प्रदान केलेला हिऱ्यांच्या हाराची किंमत किती होती, हे भाजपने जाहीर करावे, असे आव्हान राष्ट्रवादीने गुरुवारी दिले आहे.
मोदी यांच्या नावाची घोषणा झाल्यावर व्यासपीठावर बसलेल्या साऱ्याच नेत्यांनी पुष्पगुच्छ देऊन मोदी यांचे अभिनंदन केले. त्याच वेळी गडकरी यांनी मोदी यांच्या गळ्यात हिऱ्यांचा हार घातला. काही काळ मोदी यांनी तो हार गळ्यात ठेवला होता. थोडय़ा वेळाने मोदी यांनी हार काढला आणि आपल्या सचिवाकडून सुपूर्द केला याकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लक्ष वेधले. हा हार किती किंमतीचा होता हे सर्वसामान्य जनतेला समजले पाहिजे व हार सध्या कोठे आहे याची माहिती पुढे आली पाहिजे, असेही मलिक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 12:17 pm

Web Title: nitin gadkari gift diamond necklace to narendra modi
Next Stories
1 देणाऱ्यांचे हात हजारो..: दानयज्ञाला वाचकांचा उदंड प्रतिसाद
2 खासदारकीसाठी आठवलेंची मुंडेंना गळ
3 मुंबई – पुणे, नाशिक, शिर्डी टॅक्सी सेवा आजपासून महाग
Just Now!
X