News Flash

मुंबईकरांना दिलासा! एसी लोकलच्या भाडेवाढीला ६ महिने स्थगिती

पुढील सहा महिने भाडेवाढ होणार नसल्याने प्रवासी सुखावले

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर सुरु करण्यात आलेल्या एसी लोकलला चांगला प्रतिसाद मिळतोय. अशात २५ जून पासून या लोकलच्या तिकिटांचे दर वाढणार अशी बातमी आली होती. मात्र या भाडेवाढीला सहा महिन्यांची स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना थोडासा का होईना दिलासा मिळाला.

डिसेंबरमध्ये मुंबईत देशातली पहिली एसी लोकल सुरु झाली आणि मुंबईकरांचा प्रवास गारेगार झाला. ही लोकल सुरुवातीला चर्चगेट आणि बोरिवली दरम्यान चालवण्यात आली. त्यानंतर लोकलचा विरारपर्यंत विस्तार करण्यात आला. एसी लोकलचे पहिल्या सहा महिन्यांसाठीचे किमान तिकिट जीएसटीसह ६० रुपये तर कमाल तिकिट २०५ रुपये ठेवण्यात आले होते. २५ जून पासून भाडेवाढ होणार होती, मात्र ही भाडेवाढ आणखी ६ महिन्यांसाठी टळली आहे.

मुंबईकर सध्या सवलतीच्या दरात एसी लोकलचा प्रवास करत आहेत. प्रवाशांची मते जाणून घेतली असता तूर्तास भाडेवाढ करू नये अशी विनंती करण्यात आली होती. त्यामुळे सहा महिने भाडेवाढ होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 7:07 pm

Web Title: no ac local fare hike for next 6 months says western railway
Next Stories
1 मुंबई : पुढचे काही तास वादळी पावसाचे असण्याची शक्यता
2 मुंबई : कारच्या ब्रेकऐवजी दाबलं अॅक्सिलेटर, तरुणीने ५ जणांना उडवलं
3 लिफ्टमध्ये महिलेला नको तिथे स्पर्श करुन विनयभंग, बोरीवलीतील टॉवरमधील घटना
Just Now!
X