News Flash

ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवतींना प्रार्थनास्थळी प्रवेशबंदी

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी, प्रतिबंधित क्षेत्रातील धार्मिकस्थळे बंदच

पंढरपूर येथे वारकरी पाईक संघटनेचे ह.भ.प. राणा महाराज व इतरांनी लाडू वाटप करून मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

प्रार्थनास्थळे सुरू होत असली तरी ६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींनी घरीच थांबावे, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी धार्मिकस्थळांमध्ये जाणे टाळावे, असे आवाहन करणाऱ्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने शनिवारी जारी केल्या. या सूचनांचे धार्मिकस्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांनी कठोर पालन करावे, असेही बजावण्यात आले आहे.

करोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी तसेच सामाजिक अंतर पाळूनच धार्मिक किं वा प्रार्थना स्थळांमध्ये भाविकांना प्रवेश देण्याचे आदेश राज्य सरकारने धार्मिक स्थळ व्यवस्थापनांना दिले आहेत. त्यानुसार मुखपट्टीचा वापर, धार्मिकस्थळी प्रवेश करण्यापूर्वी हातांचे र्निजतुकीकरण बंधनकार करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील धार्मिकस्थळे बंदच राहणार आहेत.

ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, लहान मुले किंवा व्याधीग्रस्तांनी मंदिर प्रवेश टाळावा, असे सरकारने स्पष्ट केले आहे. परंतु, या वर्गातील नागरिकांना रोखण्याची सक्ती केलेली नाही. मात्र मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्यांनी या वर्गातील नागरिकांना प्रवेश देऊ नये, असे सरकारने म्हटले आहे.

आरोग्य सेतूची कशासाठी?

केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अ‍ॅपबाबत वादविवाद सुरू आहेत. हा अ‍ॅप सक्तीचा करता येणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारनेच न्यायालयात मांडली होती. तरीही धार्मिकस्थळांसाठी तयार करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्याचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने या अ‍ॅपची सक्ती करता येणार नाही किंवा त्याचा वापर बंधनकारक नाही, असे स्पष्ट के ल्यावरही महाराष्ट्र सरकारने मंदिरे वा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळातील प्रवेशासाठी आरोग्य सेतूचा वापर करण्याचा सल्ला कशासाठी दिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

* मंदिरे, मशिदी, चर्च किंवा अन्य धार्मिकस्थळी सबंधित व्यवस्थापनाने निर्धारित केलेल्या वेळेत आणि निर्धारित केलेल्या संख्येप्रमाणे भाविकांना प्रवेश.

* सर्व धार्मिक स्थळे तसेच प्रार्थना स्थळांमध्ये येणारे भाविक आणि पर्यटकांनी मुखपट्टी वापरणे बंधनकारक.

* धार्मिक स्थळ परिसरात अंतर नियमाचे पालन आवश्यक, थर्मल स्कॅनिंग, जंतूनाशके ठेवणे आवश्यक.

* दर्शन रांगेत दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर अत्यावश्यक.

* थुंकण्यास सक्त मनाई, मंदीरात प्रवेश करताना साबणाने हात-पाय स्वच्छ धुणे किंवा जंतूरोधकाने हातांचे र्निजतुकीरकण बंधनकारक

* आजाराची कोणतेही लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश द्यावा.

* धार्मिक स्थळी करोनाबाबत जनजागृती करणारी व्यवस्था व्यवस्थापनाने उभारावी

* दर्शनासाठी जागा निश्चिती करावी, त्यानुसार जागा चिन्हांकित (मार्किं ग) कराव्यात.

* प्रवेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असावेत.

* मुर्ती, पुतळ्यांना हात लावण्यास तसेच भजने, आरती करण्यास परवानगी नाही.

* कोणत्याही धार्मिक ठिकाणी प्रसाद वाटपास मनाई.

* सामूहिक प्रसादाची (भोजनाची)व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी नियम अंतर पाळून प्रसाद वाटपास परवानगी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 12:20 am

Web Title: no access to places of worship for senior citizens children pregnant women abn 97
Next Stories
1 नायर रुग्णालयात कलाकारांकडून रक्तद्रव दान
2 हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम स्तरावर
3 धर्मस्थळांत उद्यापासून प्रवेश
Just Now!
X