निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नगरसेविकेची मागणी

मुंबई : पालिके च्या निवडणुका जवळ येऊ लागल्यावर आता लोकप्रतिनिधींना झोपड्यांमधील मतदारांची आठवण झाल्याचे दिसते. सन २००० पूर्वीपासून असलेल्या झोपडपट्टयांनी तळमजला अधिक एक मजल्याचे असे बांधकाम के ले असल्यास त्यावर कारवाई करू नये. या वसाहतींचा पुनर्विकास होईपर्यंत या एकमजली झोपड्याना संरक्षण द्यावे, अशी मागणी भाजपने के ली आहे.

उभ्या -आडव्या वाढत चाललेल्या झोपडपट्टया ही करदात्या मुंबईकरांसाठी डोके दुखी असली तरी लोकप्रतिनिधींसाठी झोपडपट्टया म्हणजे मतपेट्या आहेत. त्यामुळे निवडणुका आल्या की लोकप्रतिनिधींना या झोपडट्टीधारकांचा पुळका येतो. पुढील वर्षी फे ब्रुवारीमध्ये पालिके च्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे साहजिकच झोपडपट्टयांसाठी नवनवीन मागण्या येत्या काळात पुढे येण्याची शक्यता आहे. अशीच एक मागणी भाजपच्या नगरसेविका शीतल गंभीर यांनी के ली आहे. २००० पूर्वीच्या संरक्षित झोपडपट्ट्यांमधील पहिला मजलादेखील संरक्षित करावा, त्या झोपड्यांचे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना संरक्षित मानून त्यावर कारवाई करु नये, अशी मागणी गंभीर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे के ली आहे. या महिन्याच्या कामकाजात ही सूचना समाविष्ट करण्यात आली आहे.

महानगर पालिकेच्या नियमानुसार १४ फूटापर्यंतच्या झोपडयांना संरक्षण आहे. मात्र, मुंबईतील काही भागातील झोपड्या या बहुमजली झाल्या आहेत. तर, जवळपास सर्वच झोपड्यांच्या तळमजल्यावर एक मजला चढला आहे. पालिकेच्या नियमानुसार १४ फुटांपेक्षा मोठ्या झोपड्यांवर कारवाई करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात २००० पर्यंतच्या सर्व एक मजली झोपडया संरक्षित कराव्या व त्याकरीता धोरण आणावे, अशी मागणी गंभीर यांनी के ली आहे.

या झोपड्यांमध्ये गरीब कु टुंबातील लोक राहत असून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. कु टुंबातील संख्या वाढल्याने व ते राहत असलेल्या झोपडीतील जागा अपुरी पडू लागल्यामुळे परवडत नसताना कर्ज घेऊन एकमजला वाढवतात, असे गंभीर यांनी आपल्या सूचनेत म्हटले आहे.  मात्र पालिका असे बांधकाम तोडून टाकते व त्यामुळे गरीबांचे नुकसान होते. २००० पूर्वीच्या वास्तव्याचा दाखला असताना ते उघड्यावर येतात, असेही गंभीर यांचे म्हणणे आहे.