News Flash

पंकज भुजबळला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

पंकजने वॉरंट रद्द करण्यासाठी संबंधित न्यायालयासमोर हजर व्हावे

pankaj bhujbal

महाराष्ट्र सदनच्या बांधकामाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज याच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) स्थापन विशेष न्यायालयाने बजावलेले अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास, तसेच अटकेपासून कुठलाही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे हे वॉरंट विशेष न्यायालयासमोर हजर राहून रद्द करण्याची मागणी करा वा अटकेपासून संरक्षण हवे असल्यास सर्वोच्च न्यायालयात जा, असेही न्यायालयाने पंकज याला कुठलाही दिलासा देण्यास नकार देताना नमूद केले.

पंकजने वॉरंट रद्द करण्यासाठी संबंधित न्यायालयासमोर हजर व्हावे, अशी सूचना न्यायालयाने केली होती. त्यावर वॉरंट रद्द होताच अटक होण्याची भीती पंकजकडून व्यक्त करण्यात आली होती. तेव्हा निर्णय विरोधात गेल्यास त्याला आव्हान देईपर्यंत अटकेपासून दोन दिवसांचा दिलासा देण्याचे न्यायालयाने म्हटले होते. मात्र, पंकजने ही सूचना अमान्य केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:40 am

Web Title: no bail for pankaj bhujbal bombay high court
Next Stories
1 ओवेसी बंधूंना धक्का!
2 पंकजा मुंडेंसह मंत्रिमंडळाला उच्च न्यायालयाचा तडाखा
3 अधिकाऱ्यांवर कारवाईचे न्यायालयाचे आदेश
Just Now!
X