News Flash

पुढील काही काळ राज्यात उत्सव नकोत

समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रातील बहुतांश नागरिक अतिशय संयमाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने या करोनाच्या विषाणूविरुद्ध लढत आहेत; पण समाजात आणखी एक समाजविघातक विषाणू पसरत आहे.

सध्याच्या परिस्थितीचा दुरुपयोग करून जर कुणी माता-भगिनी आणि महाराष्ट्रातील नागरिकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न के ल्यास अशा समाजविघातक प्रवृत्तींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. पुढील काही काळ राज्यात उत्सव नकोत, असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमांवरील थेट प्रसारणाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. सोलापूरच्या ७ वर्षांच्या आराध्या नावाच्या मुलीने वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री साहाय्यता निधीस मदत केल्याचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी उल्लेख केला.  हा विषाणू कोणताही जात-धर्म पाहत नाही. याची बाधा सगळ्यांना सारखीच होते. त्यामुळे इलाज म्हणून नाइलाजाने का होईना घरी बसा, गर्दी टाळा. संयम, जिद्द आणि आत्मविश्वासारखे दुसरे आयुध नाही. या आयुधाच्या मदतीने आपण हे युद्ध नक्की जिंकू, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी समाजविघातक कृत्ये करणाऱ्या प्रवृत्तींना स्पष्ट इशारा आणि कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

इतर राज्यांतील तसेच महाराष्ट्रातील स्थलांतरित कामगार-मजुरांची महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुही माजविणाऱ्यांवर कठोर कारवाई – मुख्यमंत्री

राज्यात गुढीपाडवा, रामनवमी, पंढरपूरची चैत्र यात्रा असे सर्व मोठे सण-उत्सव अगदी घरगुती स्वरूपात आयोजित झाले आहेत. कोणतेही सार्वजनिक उत्सव वा कार्यक्रम झाले नाहीत. त्याप्रमाणेच इतर धर्मीयांनीही आपले सण, समारंभ आणि कार्यक्रम करावेत. एकत्र येऊ नये, गर्दी करू नये. राज्यात कोणत्याही धर्माच्या, राजकीय पक्षाच्या आणि कोणत्याही कारणासाठी कोणत्याही कार्यक्रमांना, खेळाच्या स्पर्धाना परवानगी दिली जाणार नाही म्हणजे नाहीच. तशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे असे कार्यक्रम आयोजित करू नयेत.- उद्धव ठाकरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2020 12:35 am

Web Title: no celebration in the state for some time cm abn 97
Next Stories
1 करोनाच्या मुकाबल्यासाठी सव्वालाख आयुष डॉक्टरांना प्रशिक्षण
2 ‘शिधापत्रिका नसेल तर आधारकार्ड ग्राह्य़ धरून प्रत्येकाला धान्य द्या’
3 विधान परिषद निवडणूक लांबणीवर
Just Now!
X