कसारा ते आसनगाव या दरम्यानची लोकल वाहतूक ठप्प झाल्याची बातमी समोर आली आहे. कसाऱ्याहून एकही लोकल न सुटल्याने प्रवासी संतपाले आहेत. ओव्हरहेड वायर दुरूस्त करणारी व्हॅन रुळावरून घसरल्याने ही वाहतूक ठप्प झाली होती. जी आता हळूहळू पूर्वपदावर येते आहे असे समजते आहे. कसारा येथील उंबरमाळी येथे घडल्याचेही समजते आहे. संतप्त प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेल रोको केला. प्रवाशांनी रेल रोको केल्याने आणखी उशीर होतो आहे जी घटना घडली त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत आता सकाळी ११ पर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल असे ट्विट मध्य रेल्वेने केले होते. मात्र हळूहळू ही वाहतूक पूर्वपदावर येते आहे असे समजते आहे.

 

ओव्हरहेड वायर दुरुस्त करणाऱ्या व्हॅनला मालगाडीची धडक बसली. त्यामुळे ही व्हॅन रुळावरून घसरली. या घटनेमुळे सकाळपासून कसारा स्थानकातून एकही गाडी सुटलेली नाही. तर ८ ते १० लांब पल्ल्याच्या गाड्याही या घटनेमुळे रखडल्या आहेत. ज्या एक्स्प्रेस धीम्या मार्गावरून मार्गस्थ करण्याचा प्रयत्न झाला त्या गाड्या प्रवाशांनी अडवल्या आहेत. दुरूस्तीचे काम पूर्ण होण्यास एक ते दीड तास लागणार आहे तोपर्यंत या मार्गावरची वाहतूक ठप्पच राहणार आहे.

 

मुंबईकडे येणाऱ्या कोणत्या गाड्यांचा खोळंबा
११०६२ दरभंगा एलटीटी पवन एक्स्प्रेस
११०५८ अमृतसर मुंबई एक्स्प्रेस
११०१६ गोरखपूर एलटीटी कुशीनगर एक्स्प्रेस
१८०३० शालिमार एलटीटी एक्स्प्रेस
१२८१० हावडा मुंबई मेल व्हाया नागपूर<br />११४०२ नागपूर मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस
१२११२ अमरावती मुंबई एक्स्प्रेस
१२१०६ गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
१२१३८ फिरोजपूर मुंबई पंजाब मेल
१७०५८ सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्स्प्रेस
११०२५ भुसावळ पुणे एक्स्प्रेस
१२६१८ मंगला एक्स्प्रेस
२२१०२ मनमाड मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस