दंडरूपात पालिके च्या तिजोरीत १ कोटी ६५ लाख रुपये जमा

मुंबई : मुखपट्ट्यांचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यानागरिकांविरोधात पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात के ली असून ऑक्टोबर महिन्यात ८२ हजारांहून अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. नियम झुगारणाऱ्याबेफिकीर व्यक्तींकडून आतापर्यंत वसूल करण्यात आलेला एक कोटी ६५ लाख रुपये दंड पालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आला आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेह ऱ्यावर मुखपट्टी लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अनेक जण मुखपट्टीचा वापर न करताच वावरताना दिसतात किंवा मुखपट्टी असली तरी हनुवटीवर ओढून घेतलेली असते. अशा नागरिकांविरोधात पालिकेने तीव्र आणि वेगवान कारवाई करण्याचे ठरवले आहे. दर दिवशी मुखपट्टीचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या२० हजार नागरिकांना पकडण्याचे लक्ष्य नुकतेच पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहे. याअंतर्गत १ ते २१ ऑक्टोबर २०२० दरम्यान ८२ हजार ४९७ नागरिकांवर कारवाई करून प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

आतापर्यंत २ कोटींहून अधिक दंड वसूल

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत एप्रिल २०२० पासून मुखपट्ट्या न लावणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ९ एप्रिल ते २१ ऑक्टोबर २०२० दरम्यान एक लाख ७५२ नागरिकांकडून २ कोटी ३० लाख २९ हजार ४०० रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यापैकी १ ते २१ ऑक्टोबर २०२० या २१ दिवसांत एकूण ८२ हजार ४९७ नागरिकांकडून एक कोटी ६४ लाख ९६ हजार ९०० इतकी रक्कम दंड स्वरूपात वसूल करण्यात आली आहे.