25 September 2020

News Flash

निरुपम यांच्याकडून वाढीव चटईक्षेत्राचे समर्थन

दुबई, सिंगापूर आदी शहरांमध्ये किती चटईक्षेत्र निर्देशांक वापरायचा याचे अजिबात र्निबध नाहीत. मुंबईत वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक वापरून स्वस्तात घरे उपलब्ध होणार असल्यास तो वापरण्यास काहीच

| March 3, 2015 02:46 am

 दुबई, सिंगापूर आदी शहरांमध्ये किती चटईक्षेत्र निर्देशांक वापरायचा याचे अजिबात र्निबध नाहीत. मुंबईत वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक वापरून स्वस्तात घरे उपलब्ध होणार असल्यास तो वापरण्यास काहीच हरकत नाही, असे सांगत मुंबई काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष संजय निरुपम यांनी वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकाचे सोमवारी समर्थनच केले.
मुंबईत स्वस्तात घरे उपलब्ध झाली पाहिजेत, असे आपले ठाम मत आहे. मग त्यासाठी जादा एफ.एस.आय. वापरला तर बिघडले कोठे, असा सवाल निरुपम यांनी केला. आरे कॉलनीत कोणत्याही बांधकामाला परवानगी देऊ नये, तसेच मेट्रोसाठी अन्य जागेचा पर्याय सुचवावा, अशी भूमिका मांडली.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे मुंबईतील ‘नाइट लाइफ’साठी आग्रही असले तरी रात्रीच्या वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध आहे का, असा सवालही निरुपम यांनी केला. आधीच पोलिसांना १२ तासांपेक्षा जास्त काळ सेवा करावी लागते. हे सारे लक्षात घेता ही मागणी योग्य नसल्याचे मत निरुपम यांनी मांडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 2:46 am

Web Title: no need for cap on fsi in mumbai says sanjay nirupam
टॅग Sanjay Nirupam
Next Stories
1 अवकाळी पाऊस मदतीबाबत आज चर्चा
2 राजन वेळुकर राज्यपालांना भेटणार
3 सलमानचा वाहन परवाना मागविण्याची मागणी कोर्टाने फेटाळली
Just Now!
X