29 September 2020

News Flash

नो सिटी फॉर ठग्ज! मुंबई पोलिसांचा ट्विटमधून अनोखा संदेश

या मीमची चांगलीच चर्चा ट्विटरवर रंगली आहे. काही नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांना फिल्मी म्हणत या ट्विटला दाद दिली आहे.

मुंबई पोलिसांना जर सामाजिक संदेश द्यायचा असेल तर ते सोशल मीडियाचा अत्यंत चपखल वापर करतात. ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाइटचा वापर मुंबई पोलिसांनी अशाच प्रकारे केला आहे. भोवताली घडणाऱ्या आपल्याला हव्याश्या वाटणाऱ्या गोष्टींमधून जर संदेश देण्यात आला तर तो लोकांना चांगला लक्षात राहतो, अशी मुंबई पोलिसांची धारणा आहे आणि याच धारणेतून एक ट्विट मुंबई पोलिसांनी केला आहे. या ट्विटची ट्विटरवर चांगलीच चर्चा आहे. हा ट्विट आहे आमिर खानच्या ठग्ज ऑफ हिंदुस्थान सिनेमाशी संबंधित. ठग्ज ऑफ हिंदुस्थान या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला. यामध्ये आमिर एक डायलॉग म्हणतो धोका स्वभाव है हमारा! ज्याला महानायक अमिताभ बच्चन उत्तर देतात और भरोसा हमारा!

नेमका हाच संवाद वापरत मुंबई पोलिसांनी एक ट्विट केला आहे. या ट्विटला नो सिटी फॉर ठग्ज असा हॅशटॅगही जोडला आहे. त्यावरून एक मीम तयार करून ते पोस्ट करण्यात आले आहे. मुंबईत ठगांना म्हणजेच चोरांना स्थान नाही असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. या मीममध्ये आमिर खान म्हणतो धोका स्वभाव है हमारा, तर दुसरीकडे मुंबई पोलीस म्हणतात और भरोसा हमारा. या मीमची चांगलीच चर्चा ट्विटरवर रंगली आहे. काही नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांना फिल्मी म्हणत या ट्विटला दाद दिली आहे. तर अनेकांनी हा ट्विट आपल्याला आवडला असल्याचे विविध मीम्स तयार करून सांगितले आहे. याआधी सेक्रेड गेम्स या सीरिजवरूनही एक ट्विट मुंबई पोलिसांनी केला होता. आता ठग्ज ऑफ हिंदुस्थानवरून एक मीम तयार करून तो ट्विट करण्यात आला आहे ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. ही बातमी करेपर्यंत पाचशेपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हा ट्विट रिट्विट केला आहे. तर ९७ जणांनी त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. २ हजारांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हा ट्विट लाइक केला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 4:27 pm

Web Title: no place for thugs in mumbai mumbai police tweets new tweet
Next Stories
1 लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्यावेळी समुद्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला
2 मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील कवितेवरुन वाद; आदिवासी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान
3 बोरिवली बनले मुंबईतील पहिले ‘अंधमित्र’ रेल्वे स्थानक
Just Now!
X