News Flash

दिवाकर रावते खरंच नाराज आहेत का?; पहा काय म्हणाले…

गेल्या फडणवीस सरकारमध्ये रावते यांच्यावर परिवहन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, आत्ताच्या ठाकरे सरकारमध्ये त्यांना संधी देण्यात आलेली नाही.

दिवाकर रावते

राज्यातील उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे आमदार दिवाकर रावते नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, यावर त्यांनीच स्पष्टीकरण दिलं असून आपण नाराज नसल्याचं म्हटलं आहे.

रावते म्हणाले, “मी एक प्रामाणिक शिवसैनिक असून भविष्यातही राहणार आहे. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने दिलेल्या आदेशाचा मी आदर करतो. मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमालाही मी हजर होतो, त्यामुळे पक्षावर मी नाराज असण्याचे कोणतेही कारण नाही.”

गेल्या फडणवीस सरकारमध्ये रावते यांच्यावर परिवहन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, आत्ताच्या ठाकरे सरकारमध्ये त्यांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे इतर अनेक नाराजांच्या यादीत रावतेंचेही नाव जोडले गेले होते. मात्र, आपण पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचा आदर करणारा एक निष्ठावंत शिवसैनिक असल्याचे सांगत त्यांनी या चर्चेवर पडदा टाकला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2020 2:48 pm

Web Title: no question of being unhappy with party says diwakar raote aau 85
Next Stories
1 ‘शिवभोजना’च्या अटींवरून निलेश राणेंचा शिवसेनेला टोला
2 २०२२ पर्यंत इंदू मिलमधील स्मारकाचं काम पूर्ण करणार – अजित पवार
3 शीर नसलेला मृतदेह सापडल्यानंतर आता पोलिसांना सापडले पाय, गूढ अद्यापही कायम
Just Now!
X