05 June 2020

News Flash

Coronavirus outbreak : बेस्ट प्रवासात सामाजिक अंतराचे तीनतेरा

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची गर्दी; करोना फैलावाचा धोका; प्रशासनाचेही दुर्लक्ष

(संग्रहित छायाचित्र)

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची गर्दी; करोना फैलावाचा धोका; प्रशासनाचेही दुर्लक्ष

मुंबई : अत्यावश्यक सेवा असलेल्या सार्वजनिक परिवहन सेवांमधील प्रवासात सामाजिक अंतर ठेवण्याचे बंधनकारक असतानाही त्याचे तीनतेरा वाजत आहेत. याची प्रचीती बेस्ट बसगाडय़ांमधील प्रवासात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट उपक्र माकडून सुरू असलेल्या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे.  यामुळे करोना फैलावाचा धोका कायम आहे. बसमधील गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी बेस्ट उपक्र माने अद्याप कोणताही तोडगा काढलेला नाही. तर सामाजिक अंतराच्या पालनाचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनादेखील विसरच पडलेला दिसतो.

करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू केल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील १६ मार्गाव्यतिरिक्त डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार मुंबईतून थेट पनवेल, कल्याण, बदलापूर, वसई-विरारसाठीही बेस्ट बसची विशेष सुविधा आहे. याशिवाय मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पालघर, पनवेल, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानक हद्दीतून मुंबईतील बोरीवली, वाशी, दादर, ठाणे (खोपट)पर्यंत एसटी असून तेथून पुढे बेस्ट बसद्वारे शहरांतर्गत वाहतूक होत आहे. तरीही ही सुविधा अपुरीच पडते.

बसमधून प्रवास करताना उभ्याने प्रवास करण्यास शासनाने मनाई केली आहे. मात्र गर्दीमुळे बसण्यासाठी जागा नसल्याने कर्मचाऱ्यांना उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे बेस्ट बसमध्ये अनेक जण यात एकमेकांना खेटून उभे असतात. तर कर्मचारी आसनांवरही बाजूबाजूलाच बसतात. गर्दीमुळे काही कर्मचारी बसच्या पायऱ्यांवरही ठाण मांडतात. बेस्ट वाहकालाही प्रवाशांच्या गर्दीतून वाट काढताना नाकीनऊ येतात. सामाजिक अंतराचे पालन करण्यावरून प्रवासादरम्यान काही कर्मचाऱ्यांमध्येही वाद होतात. भाजपचे बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी बेस्टने बसगाडय़ा फे ऱ्यांचे योग्य नियोजन करण्याबरोबरच सामाजिक अंतराचे पालन होते की नाही याकडेही लक्ष देण्याची मागणी के ली.

एका बसमधून ७० पेक्षा जास्त प्रवासी

म्युनिसिपल मजदूर युनियनचे सचिव प्रदीप नारकर यांनी सध्या एका बसमधून ७० पेक्षा जास्त प्रवासी  प्रवास करत असल्याचे सांगितले. मुंबईत कस्तुरबा, सायन, के ईएम, जे.जे. यांसह अन्य मोठी रुग्णालये आहेत. उपनगर ते शहर ते उपनगर असा सकाळ व रात्री उशिरापर्यंत प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागतो. यात करोना फै लावाचा धोका असून त्यामुळे जादा बसगाडय़ा सोडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा प्रवास सोयीस्कर करण्याची मागणी त्यांनी पालिका, बेस्टकडे के ल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 2:46 am

Web Title: no social distancing followed by emergency services staff during best bus travel zws 70
Next Stories
1 Coronavirus : अत्यावश्यक सेवेकरींचा संकटांशी सामना
2 उच्च न्यायालयाच्या दूरचित्रसंवाद सुनावणीत आता सर्वसामान्यांनाही सहभागी होण्याची सुविधा
3 राज्यपालांच्या हस्तक्षेपामुळे दोन सत्ताकेंद्रे
Just Now!
X