23 September 2020

News Flash

कुर्ला-घाटकोपरमध्ये बुधवारी पाणी नाही

घाटकोपर येथे ७२ इंच जलवाहिनीच्या पर्यायी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे २८ ते २९ मे या एक दिवसासाठी एल आणि एन विभागात

| May 24, 2014 03:35 am

घाटकोपर येथे ७२ इंच जलवाहिनीच्या पर्यायी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे २८ ते २९ मे या एक दिवसासाठी  एल आणि एन विभागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. २८ मे रोजी सकाळी दहा वाजता काम सुरू होणार असून ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत चालणार आहे. एल विभागातील साने गुरुजी नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, हिल क्रमांक २, जंगलेश्वर महाराज मार्ग, मोहिली पाईप लाइन मार्ग आणि एन विभागातील आनंदनगर पार्कसाइट, विक्रोळी पार्क साइट, रामनगर, गोळीबार मार्ग, भीमनगर, कातोडी पाडा, भटवाडी, बर्वे नगर, सिद्धार्थ नगर, चिराग नगर, पारशी वाडी, काजू टेकडी, सवरेदय नगर व नारायणनगर येथे या कालावधीत २४ तासांसाठी पाणीपुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 3:35 am

Web Title: no water for kurla ghatkopar on wednesday
Next Stories
1 शिवसेनेच्या बदलापूर उपशहरप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या
2 बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी उपायुक्तास अटक
3 ‘म्हाडा’कडून आठ इमारती अतिधोकादायक जाहीर
Just Now!
X