News Flash

मुंबईकरांना पाण्याची कमतरता नाही; जयंत पाटील

करोनाच्या संकटात मुंबईकरांसाठी चांगली बातमी

प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आले असल्याची गुड न्यूज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईकरांना दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार मुंबईला पाणी पुरविणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे. मुंबईची लोकसंख्या पाहता मुंबईला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागतो. झोपडपट्टी भागात अनेकदा पाणी मिळत नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळते मात्र वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडल्याने मुंबईतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 4:47 pm

Web Title: no water shortage in mumbai says jayant patil scj 81
टॅग : Jayant Patil
Next Stories
1 मुंबईची तुंबई! सकाळपासून मुसळधार पाऊस, हिंदमातासह सखल भागात साचलं पाणी
2 Coronavirus Outbreak : वाढत्या मृत्यूदराची चिंता
3 प्रवासासाठी नागरिकांकडून दुचाकीला पसंती
Just Now!
X