11 August 2020

News Flash

जलवाहिनी दुरुस्तीमुळे मुंबईत बुधवारी पाणीपुरवठा बंद

पालिकेच्या जल विभागातर्फे शिवडी येथे जलवाहिनीवर झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ६ ऑगस्ट रोजी ...

| August 4, 2015 12:01 pm

पालिकेच्या जल विभागातर्फे शिवडी येथे जलवाहिनीवर झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० या काळात परळ, लालबाग, चिंचपोकळी, शिवडी, माटुंगा, दादर, नायगाव, शीव  परिसरांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल.
शिवडी येथील रफी अहमद किडवाई मार्गावरील १,४५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर झडप बसविण्याचे काम बुधवारी सकाळी १० वाजता सुरू करण्यात येणार आहे. हे काम ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पूर्ण होईल. त्यामुळे या काळात एफ-उत्तर विभागातील शीव, माटुंगा, दादर, पारशी वसाहत, हिंदू वसाहत, दादर टीटी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग, कात्रक मार्ग, आर. ए. किडवाई मार्ग, सहकारनगर महापालिका वसाहत, कोरबा मिठागर तसेच एफ-दक्षिण विभागातील दादर, नायगाव, परळ, लालबाग, चिंचपोकळी, एस. एस. राव मार्ग, शिवडी पूर्व-पश्चिम, ज्ञानेश्वरनगर, शिवडी महापालिका क्षयरोग रुग्णालय, अभ्युदयनगर येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा.
कमी दाबाने पाणी
मरोशी ते रुपारेल दरम्यान ३००० मि.मी. व्यासाच्या भूमिगत जलबोगद्याचे काम पूर्ण झाले असून उध्र्व वैतरणा जलवाहिनीवर मरोशी ते सहारा दरम्यान जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.  ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते ७ ऑगस्ट रोजी रात्री १० या काळात प्रेम नगर, शताब्दी नगर, नाईक नगर, खामदेव नगर, एम. जी. मार्ग, आंध्रा व्हॅली येथे ७ ऑगस्ट रोजी पाणी नसेल. तसेच ६ ऑगस्टला दुपारी ४ ते रात्री धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग येथे कमी दाबाने पाणी येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2015 12:01 pm

Web Title: no water supply in mumbai on wednesday due to pipeline work
Next Stories
1 रेल्वेतील सुरक्षेसाठी ५४० कोटी रुपये खर्च
2 सहकार क्षेत्रावर हुकूमत ठेवण्यासाठी सरकारची खेळी
3 पालिकेच्या पळवाटेला चाप
Just Now!
X