News Flash

ठाण्यात बुधवारी पाणी नाही

दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने ठाण्यातील अनेक भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली.

| November 20, 2013 02:19 am

दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याने ठाण्यातील अनेक भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली. परंतु तांत्रिक कारणास्तव काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे बुधवार रात्री नऊ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. तसेच या कामामुळे पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
ठाणे शहर, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, वागळे इस्टेट, इंदिरानगर, श्रीनगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी, सिद्धेश्वर, महागिरी, वृंदावन, श्रीरंग, चरई, कळवा, खारेगांव, रेतीबंदर, मुंब्रा, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रोड, आझादनगर, डोंगरीपाडा, ओवळा, वाघबीळ, माजिवडा, बाळकुम, मानपाडा, ढोकाळी, कोलशेत, टिकुजिनीवाडी, घोडबंदर रोड व खारटन रोड परिसराला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
वागळे इस्टेट परिसराचा वीजपुरवठा बंद
ठाणे : महावितरण कंपनीच्या वागळे इस्टेट विभागांतर्गत येणाऱ्या वागळे इस्टेट या विभागातील दोन फीडरच्या जुन्या वाहिनीबदलाचे काम बुधवार, २० नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे काम चालणार असून त्यामुळे केणीनगर, अ‍ॅग्रीकल्चर ऑफिस, इंदिरानगर, जोस्ट बिल्डिंग, सी.पी. तलाव, साठेनगर, आंबेवाडी या भागांत या काळात वीजपुरवठा बंद राहणार आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2013 2:19 am

Web Title: no water supply in thane on wednesday
Next Stories
1 ‘कॅम्पाकोला’ला पुन्हा दणका; घर रिकामी करण्याचे हमीपत्र द्या- सर्वोच्च न्यायालय
2 कळव्यात चारमजली बेकायदा इमारत जमीनदोस्त
3 परप्रांतीयांवरून शिवसेना लक्ष्य
Just Now!
X