News Flash

पंकज भुजबळांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

पंकज भुजबळ यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट

मनी लाँड्रींग प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज यांच्यासह आणखी ३४ जणांविरोधात हे अटक वॉरंट बजावले आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पुतणे समीर भुजबळ हे दोघेही तुरूंगात असताना आता पंकज भुजबळ यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. मनी लाँड्रींग प्रकरणी विशेष न्यायालयाने छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज यांच्यासह आणखी ३४ जणांविरोधात हे अटक वॉरंट बजावले आहे.
भुजबळ काका-पुतण्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
दरम्यान, महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या अटकेत असलेले छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्यासमोर अडचणी कायम आहेत. दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. दोघांनाही ११ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2016 7:07 pm

Web Title: non bailable warrant against pankaj bhujbal
टॅग : Pankaj Bhujbal
Next Stories
1 हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी खुशखबर, २९ एप्रिलपासून १२ डब्यांची लोकल
2 भुजबळ काका-पुतण्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
3 बेकायदा बांधकामांना संरक्षण देणाऱया सरकारच्या धोरणाला हायकोर्टाकडून केराची टोपली
Just Now!
X