अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे येत्या १५ मार्चपर्यंत करण्यात येणार असून, त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱयांना मदतीची घोषणा करण्यात येईल, असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली झालेलीय बैठकीत राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. नुकसानीचे पंचनाने करुन तातडीने अवहाल देण्याचे सर्व विभागीय आयुक्तांना त्यांनी आदेश दिले आहेत. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, सोयाबीन, आंबा, काजू, द्राक्षे, बेदाणे अशा हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकटय़ा यवतमाळ जिल्ह्यातच १५ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यावरुन राज्यातील एकूण नुकसानीचा आकडा मोठा असणार आहे.