News Flash

मालवणीमधील बेपत्ता नूर मोहम्मद घरी परतला, चौकशी सुरू

दोनच दिवसांपूर्वी वाजिद शेख या तरुणाला दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले

आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय असलेल्या मुंबईतील मालवणी भागातून बेपत्ता झालेला आणखी एक तरूण गुरुवारी घरी परतला. नूर मोहम्मद असे या तरुणाचे नाव आहे. दोनच दिवसांपूर्वी वाजिद शेख या तरुणाला दहशतवादविरोधी पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले होते. तोही घरी परतत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला सोडून देण्यात आले. आता नूर मोहम्मद परतल्यामुळे त्याच्याकडेही पोलीस अधिक चौकशी करत आहेत. त्याचा इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का, याचाही तपास करण्यात येतो आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी येथील तीन तरुण आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. अयाज सुलतान, मोहसीन शेख आणि वाजिद शेख अशी या तरुणांची नावे होती. त्यानंतर आणखी दोन तरूण घरातून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामध्ये नूर मोहम्मदचा समावेश होता. आता वाजिद शेख आणि नूर मोहम्मद घरी परतले आहेत. अन्य तरुणांचा शोध घेण्यात येतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 24, 2015 11:44 am

Web Title: noor mohammed from malvani returned home
टॅग : Isis,Islamic State
Next Stories
1 तळीरामांचा यक्षप्रश्न ‘चक्रधरां’च्या पथ्यावर!
2 नाल्यांच्या सफाईत कंत्राटदारी अडथळा!
3 ‘टेकफेस्ट’मध्ये तंत्रज्ञानाच्या अफालातून करामती
Just Now!
X