आरोपीला जामिनानंतर पुन्हा अटक
कांदिवलीच्या पोईसर येथे सहा वर्षीय मुलीच्या विनयभंगाप्रकरणी जामिनावर सुटलेल्या बाबुलाल पटेल (५२) याला पोलिसांनी सोमवारी बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. वैद्यकीय चाचणीत त्या मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पटेल याला पुन्हा अटक केली आहे.
१२ डिसेंबर रोजी कांदिवलीच्या पोईसर येथील चाळीत राहणाऱ्या एका सहा वर्षांच्या मुलीच्या विनयभंगाप्रकरणी पोलिसांनी त्या चाळीचा मालक बाबूलाल पटेल (५३) याला अटक केली होती. त्याला लगेच १३ डिसेंबरला जामिनावर सोडले होते. सोमवारी पोलिसांनी भगवती रुग्णालयातून या मुलीचा वैद्यकीय चाचणी अहवाला प्राप्त झाला. त्यात मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पटेल याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पटेल हा मुले आणि नातवांसह या चाळीत राहतो. त्याने खेळण्याच्या बहाण्याने या मुलीला घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 25, 2012 4:45 am