08 July 2020

News Flash

वृक्षछाटणीवरून ऋषी कपूरला नोटीस

पालिकेतील अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर सहाच फांद्या तोडण्यासाठी परवानगी दिली.

वृक्षछाटणीवरून ऋषी कपूरला नोटीस

 

वांद्रे परिसरातील हिल रोड येथील भूखंडावरील वटवृक्षाच्या सहा फांद्या तोडण्याची परवानगी घेऊन वृक्षाची मोठय़ा प्रमाणावर कत्तल केल्याप्रकरणी पालिकेने प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. या प्रकरणी र्सवकष चौकशी करून त्यांच्याविरुद्ध प्रथम खबरी अहवाल दाखल करण्यात यावा, असे पत्र पोलिसांना पाठवले आहे.

वांद्रे येथील ५६, हिल रोडवरील ‘कृष्णराज’ इमारतीच्या भूखंडावर एक मोठा वटवृक्ष असून या वृक्षाच्या सहा फांद्या छाटण्यासाठी ऋषी कपूर यांनी पालिकेच्या एच-पश्चिम विभाग कार्यालयाकडे परवानगी मागितली.  पालिकेतील अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर सहाच फांद्या तोडण्यासाठी परवानगी दिली. मात्र सहा फांद्या तोडण्याऐवजी या वृक्षाच्या सर्वच फांद्या छाटण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी नंतर केलेल्या पाहणीत आढळून आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांनी बुधवारी ऋषी कपूर यांच्यावर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. कपूर यांना या नोटिशीला २४ तासाच्या आत उत्तर द्यावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2017 2:16 am

Web Title: notice to rishi kapoor on tree cutting
Next Stories
1 बेस्टच्या ताफ्यात ३०० नव्या बस
2 भोंगेही नको अन् ढोल-ताशेही!
3 तक्रार देणाऱ्यांनाच पोलिसांकडून मारहाण
Just Now!
X